पुणे, 19 एप्रिल : उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपदावरून राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. कॅबिनेटने निर्णय घेऊनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावर अजूनही शिक्कामोर्तब केलं नाही. त्यामुळे भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत थेट भाजपलाच खडेबोल सुनावले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपद पेचप्रसंगावरून भाजपचे सहयोगी सदस्य आणि माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी थेट राज्यपालांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. 13 दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. आता कॅबिनेटने मंजुरी दिलेली असतानाही राज्यपालांनी अद्याप मुख्यमंञ्यांच्या विधान परिषद आमदारकीवर का शिक्कामोर्तब केलं नाही, असा सवालच त्यांनी उपस्थित केली आहे.
तसंच याकामी स्वत: विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन या पेचप्रसंगातून मार्ग काढावा, अन्यथा महाराष्ट्र कदापिही माफ करणार नाही, असंही काकडे यांनी भाजप नेतृत्वाला सुनावलं आहे.
हेही वाचा - सगळ्यात कमी वयाच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, 45 दिवसाच्या बाळाने सोडले प्राण
तसंच, 'जर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती स्वीकारली नाही. तर हे राज्यासाठी शोभणारे ठरणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्यपालांशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य बनण्याचा पेच सोडवावा, दोघांनीही क्षत्रियासारखी विरोधकाची भूमिका बजवावी, असंही काकडे म्हणाले.
हेही वाचा - कोरोना टेस्टिंगमध्ये महाराष्ट्रच नंबर वन! योगींचं उत्तरप्रदेश कितव्या स्थानी?
तसंच, कोरोनाच्या लढ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे. देशात सर्वात पहिले त्यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या नंतर पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाउनचा निर्णय घेतला. महाराष्ट्राबरोबरच देशापुढे कोरोनाचे मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना सहकार्य केलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
संपादन - सचिन साळवे