समृद्धी महामार्गाच्या जमिनीला एकरी 50 लाखाचा भाव मिळणार

समृद्धी महामार्गाच्या जमिनीला एकरी 50 लाखाचा भाव मिळणार

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी जिरायती जमिनीला सरासरी एकरी 50 लाख रुपये दर मिळणार आहे तर बायायतीसाठी जिरायतीच्या दुप्पट मोबदला मिळेल

  • Share this:

 

नाशिक, 6 जुलै: अखेर समृद्धी महामार्गसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सरकारनं जाहीर केलीय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणी सिन्नर या 2 तालुक्यातील 48 गावातून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी भूसंपादनाचे दर देखील जाहीर केलेत. जिरायत जमिनीसाठी प्रति हेक्टर 41 लाख ते 84 लाख असा भाव सरकारने निश्चित केलाय. तर बागायती जमिनीसाठी जिरायतीच्या दीडपट मोबदला मिळणार आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील 6 गावातील जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध अजूनही कायम आहे.

पाहुयात GFX च्या माध्यमातून हे दर -

- समृद्धी महामार्गसाठी सरकारी दर जाहीर

- भूसंपादनासाठी प्रशासन आग्रही

- कमिटीने निश्चित केलेल्या दराच्या 5 पट मोबदला मिळणार

- जिराईत जमिनीसाठी 41 लाख दर हेक्टर ते 84 लाख 68 हजार

- हंगामी बागाईत जमिनीसाठी जिराईतच्या दीडपट दर मिळणार

- बागायतीसाठी जिराईतच्या दुप्पट मोबदला मिळणार

- घर, फळझाड याकरिता किमतीच्या अडीच पट मोबदला

- संमती देणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर 48 तासात पैसे जमा होणार

- शिवडेसह 6 गावांची मोजणी बाकी

- भूसंपादनाला विरोध असणाऱ्या गावांमध्ये चर्चात्मक तोडगा काढणार

First published: July 7, 2017, 9:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading