नवं सरकार नवा वाद! बाळासाहेब ठाकरे की अटलबिहारी वाजपेयी?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लागोपाठ निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी असा मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आता नव्या कारणाने वादात सापडण्याची शक्यता आहे. महामार्गाचे काम गतीने सुरू नसले तरी त्याच्या नावावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावं असा प्रस्ताव भाजपने दिला होता. आता त्याऐवजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याची लवकरच घोषणा केली जाईल असंही म्हटलं जात आहे.

मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमधील 710 किमी अंतराचा प्रवास फक्त 6 तासात या महामार्गामुळे होणार आहे. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. तीन वर्षात महामार्गाचे बांधकाम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यातल्या 350 गावांमधून जाणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचं निश्चित केलं असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

सुरुवातीला या प्रकल्पाना शेतकऱ्यांनी विरोध केला होता. शिवसेनेनेसुद्धा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प असल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात यावे अशी मागणी केली होती. गेल्या वर्षी मंत्रीमंडळ बैठकीवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. देशात पहिल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे शिल्पकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावं असं शिवसेनेनं म्हटलं होतं. त्यानंतर नावाचा वाद निर्माण झाला होता.

वाचा : भाजपमधून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या खडसेंना शिवसेनेकडून अद्याप वेळ नाही!

दरम्यान, शिवसेनेच्या या मागणीनंतर आधीच या महामार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाद कशाला? दबावाचं राजकारण करू नका असंही फडणवीस यांनी सेना नेत्यांना सुनावलं होतं. तेव्हा बाळासाहेबांचे नाव महामार्गाला दिले नाही तर राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेनं दिला होता.

वाचा : सत्तानाट्य संपल्यानंतर राज ठाकरे मैदानात, कोणाला करणार टार्गेट?

First Published: Dec 10, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading