शिर्डी, 26 मे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिर्डी ते भरवीर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाच्या लोकार्पणावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेरो-शायरी तर केलीच, पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही निशाणा साधला.
'लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. साईबाबांसमोर नतमस्तक होतो. येत्या 6 महिन्यांमध्ये हा महामार्ग पूर्ण होईल. शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते तेव्हा आम्ही हे स्वप्न बघितलं. मागास भागाचा विकास करण्यासाठी हा महामार्ग आहे. अनेकांना हे स्वप्न वाटायचं. मला विश्वास होता, रेकॉर्ड टाईममध्ये हे काम पूर्ण होईल. अंदाज कुछ अलग है मेरा, किसको मंजिल पाने का शौक हे, मुझे रास्ता बनाने का,' असा शेर देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्यामुळे फडणवीस यांच्या या शायरीचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
'तुम्ही जर प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिले तर महाराष्ट्राचा हा प्रकल्प मार्गी लागेल. अनेकांनी विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरला सभा घेतली, आम्ही जमीन देणार नाही सांगितलं. पवार साहेबांनी बैठक घेतली, पण एकनाथराव बैठकीला गेले, अख्ख्या गावाची रजिस्ट्री एका दिवसात केली, ही जमीन 9 महिन्यांमध्ये एक्वायर केली,' असं फडणवीस म्हणाले.
🕔 5.05pm | 26-05-2023 📍 Ahmednagar | संध्या. ५.०५ वा. |२६-०५-२०२३ 📍अहमदनगर. LIVE | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी शिघ्र संचार द्रुतगती महामार्गाचे उदघाटन#SamruddhiMahamarg #Highway #Maharashtra https://t.co/aFL1LUYJVN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2023
'मी मोपलवार आणि त्यांच्या टीमचा उल्लेख केरन, सौनिक साहेब, प्रविण परदेशी या सगळ्यांनी मेहनत केली. जमीन एक्वायर केली, विरोधी पक्षाचे आमदार भेटले की म्हणायचे तुम्ही फेकताय, पण महामार्ग झाला. पहिलं नवनगर इथेच करू. हा इकोनॉमिक कॉरिडोअर आहे. पार गोंदियापर्यंत विकास होईल,' असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंटलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकर करू, अपघात झाले आहेत. कंडम टायर खराब गाड्या घेऊन महामार्गावर आलात की अपघात होतात, म्हणून सिस्टीम गरजेची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच मराठवाडाही समृद्धी महामार्गामुळे बदलेल समृद्धी येईल, आम्ही काम कऱणारे लोक आहोत, फाईलवर बसणारे लोक नाही, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde