समृद्धी प्रकल्पाच्या मोबदल्यावरून वाद; जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप

बहुचर्चित मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सहमतीनेच थेट वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करण्यात येईल, असं सरकार वारंवार सांगतंय. प्रत्यक्षात मात्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांची फसवणूकच केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलाय

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 10:23 AM IST

समृद्धी प्रकल्पाच्या मोबदल्यावरून वाद; जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई,26सप्टेंबर: देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून समृद्धी हायवे प्रकल्प ओळखला जातो. पण आता या प्रकल्पातील जमिनीच्या मोबदल्यावरून शेतकऱ्यांच्या नाराजीला सरकारला सामोरं जावं लागतं आहे. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची रस्ते विकास महामंडळाकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप होतो आहे.

४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या बहुचर्चित मुंबई-नागपूर शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सहमतीनेच थेट वाटाघाटीद्वारे जमीन खरेदी करण्यात येईल, असं सरकार वारंवार सांगतंय. प्रत्यक्षात मात्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांची फसवणूकच केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलाय. प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेत जमा झालेले पैसे रोखले जात आहेत. तर दुसरीकडे जमीन खरेदीस सहमती दिली नाही तर मिळणाऱ्या पैशातून २५ टक्के कपात करण्याची भीती शेतकऱ्यांना दाखविली जाते आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी थेट खरेदीसही विरोध दर्शवीत समृद्धी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. पण या सगळ्यात सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या जनता दरबारातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...