मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे तयार होतात अत्यंत गलिच्छ वातावरणात

मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे तयार होतात अत्यंत गलिच्छ वातावरणात

पिंपरी चिंचवडसह परिसरात असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ वातावरणात तयार होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी चिंचवड, 9 जून - पिंपरी चिंचवडसह परिसरात असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ वातावरणात तयार होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी समोसे बनविणाऱ्या कारखाऱ्यावर रविवारी धाड टाकली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी परिसरातील एम. के.एंटरप्राईज कंपनीमार्फत या समोस्यांच उत्पादन घेतले जाते. मात्र, ज्या ठिकाणी समोसे बनविले जातात ते ठिकाण अत्यंत गलिच्छ असल्याचे या कारवाईत उघड झाले. दरम्यान, या कारवाईनंतर सदर समोसे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पुणे अन्न व औषध प्रसासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली आहे.

मल्टिप्लेक्स संदर्भात गिरीश बापटांनी दिला होता हा इशारा..

केंद्र सरकारने आवेष्टीत वस्तू नियमात सुधारणा केली असून खाद्यपदार्थांची जादा दराने विक्री करणाऱ्या मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि फूड मॉलवर येत्या कठोर कारवाई करण्याचा इशारा माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिला होता. तसेच सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेणाऱ्या प्रेक्षकाला कुणीही अटकाव करू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

महामार्गावरील फूडमॉल्स आणि महानगरातील मल्टिप्लेक्स सिनेमागृहे व अन्य मॉल्समध्ये उत्पादकांमार्फत जादा किंमत छापून ग्राहकांची लूट केली जात होती. तशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. अन्न व नागरी पुरवठा विभागाने विशेष मोहिम राबवून अशा उत्पादकांवर कारवाई केली होती.

VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

First published: June 9, 2019, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading