मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अतिविषारी मण्यार चावल्याने भावाचा मृत्यू; अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाने केला दंश

अतिविषारी मण्यार चावल्याने भावाचा मृत्यू; अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाने केला दंश

मण्यार जातीच्या अतिविषारी सापानं एका अल्पवयीन मुलाला दंश केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच सापानं मृत मुलाच्या बहिणीला देखील दंश केला आहे.

मण्यार जातीच्या अतिविषारी सापानं एका अल्पवयीन मुलाला दंश केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच सापानं मृत मुलाच्या बहिणीला देखील दंश केला आहे.

मण्यार जातीच्या अतिविषारी सापानं एका अल्पवयीन मुलाला दंश केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्याच सापानं मृत मुलाच्या बहिणीला देखील दंश केला आहे.

  • Published by:  News18 Desk

विटा, 09 ऑक्टोबर: खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला झोपेत मण्यार जातीचा साप चावल्याची (Manyar snake bite brother while sleeping) घटना घडली होती. सापानं दंश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित अल्पवयीन मुलाचा मृत्यू (brothers death) झाला. या दुर्दैवी घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित मुलाच्या विवाहित बहिणीला त्याचं मण्यार सापानं दंश (Same manyar snake bite sister also) केला आहे. एकाच मण्यार सापानं दोन्ही भाऊ बहिणीला दंश केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित विवाहित मुलीवर सांगली येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विराज सुनिल कदम असं साप चावल्यानं मृत पावलेल्या 16 वर्षीय मुलाचं नाव आहे. मृत विराज हा आळसंद येथील भाळवणी रस्त्यावरील एका वस्तीवर आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो. दरम्यान बुधवारी रात्री घरात सर्वजण गाढ झोपले असताना,  16 वर्षीय विराजला मण्यार जातीच्या अतिविषारी सापाने दंश केला. गुरुवारी सकाळी त्याला त्रास होऊ लागला. संबंधित प्रकार लक्षात आल्यानंतर, नातेवाईकांनी विराजला त्वरित पलूस येथील रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर विटा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र याठिकाणी उपचार सुरू असताना गुरुवारी विराजचा दुर्दैवी अंत झाला.

हेही वाचा-कारखाना मालकांकडून विवाहितेसोबत विकृतीचा कळस; 31 वर्षांपासून देत होते नरक यातना

भावाच्या मृत्यूमुळे विवाहित बहीण सायली वृषभ जाधव माहेरी आली होती. गुरुवारी रात्री घरात सर्वजण झोपले असता, बुधवारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. घरात लपून बसलेल्या मण्यार सापनं सायलीलाही दंश केला. सापानं दंश केल्यानंतर तिने आपल्या आईला उठवलं, तेव्हा आईच्या हातावरून मण्यार साप सळकन निघून गेला.

हेही वाचा-'...तुम्हाला काम देतो' सांगत डोंगरावर नेऊन महिलेसोबत भयावह कृत्य; पुण्यातील घटना

अपरात्री घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबीय हादरले. त्यांनी त्वरित सायलीला सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी सायलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. सायलीला दंश केल्यानंतर कदम कुटुंबीयांनी मण्यार जातीच्या या अतिविषारी सापाला पकडलं आहे. अवघ्या एक दिवसाच्या अंतराने मण्यार सापानं दोघां बहीण-भावाला जंश केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Snake