रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया

लोकांनी सोशल मीडियावर रितेश देशमुखला या फोटोबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली

  • Share this:

मुंबई, 06 जुलै: रितेश देशमुखनं इन्स्टाग्रामवर रायगडावरचे वादग्रस्त फोटो टाकले आणि सगळीकडे टीकेची झोड उठली. या फोटोंमध्ये स्वतः रितेश, दिग्दर्शक रवी जाधव, पानीपतकार विश्वास पाटील आणि इतर सहकारी होते. फोटोवर होणारी टीका पाहता रितेश देशमुखनं ट्विट करून शिवप्रेमींची माफी मागितली. सोशल मीडियावर त्याच्या या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना संभाजीराजे छत्रपती यांनीही ट्विटर मार्फत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा: तू माझी आयडॉल आहेस मनिषा... सोनालीने व्यक्त केली भावना

रितेशच्या माफीनाम्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी ट्विट करत म्हटले की, 'रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटींचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे. आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील.'

हेही वाचा: मदर तेरेसांच्या संस्थेतून झाली मुलांची विक्री, संशयितांना अटक

दरम्यान, रितेशने शेअर केलेल्या फोटोबद्दल माफी मागत म्हटले की, 'आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मीही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो. त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं.'

'आजन्म त्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती. तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता.ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो.'

हेही वाचा: Thai Cave Rescue: मुलांना वाचवताना माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू

First published: July 6, 2018, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading