'आरक्षण गेलं खड्डयात', मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले

'आरक्षण गेलं खड्डयात', मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले

मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 जून : 'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवी पर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,' असं म्हणत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने आपले आयुष्य संपवलं आहे. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. या घटनेबद्दल ट्विटरवर माहिती देत संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'मला वाटतंय की आपल्या 'व्यवस्थेतच' मोठा दोष आहे. मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न मार्गी का लागत नाहीत? शेतकऱ्याच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही?' असे सवाल करत संभाजीराजे यांनी आरक्षणाच्या आणि इतर प्रश्नांवर भाष्य केलं आहे.

संभाजीराजेंचा संताप, मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर नक्की काय म्हणाले?

"गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहिल ते युवक आणि ज्यांच्यामुळे आज आपलं जीवंत असणं सुरक्षित आहे ते शेतकरी, या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वतःला संपवत आहेत?

भाषणात बोलताना देशहित समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचं आहे कां? की उगाच मुह में राम, बगल में सूरी असा प्रकार चालू आहे? नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा? त्याच्या आयुष्याची तर खरी सुरुवात होती.

समाजाचे अग्रणी म्हणून आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सरकार मधले नेते असोत किंवा विरोधी पक्षातले. 'योग' करत आपण दोन मिनिट शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत?? आपल्याला नेमकं काय मिळवायचंय??

यामध्ये

नेत्यांसोबत प्रशासनसुद्धा तेवढंच जबाबदार आहे.केवळ नेत्यांवर प्रत्येक गोष्ट शेकते म्हणून तुमच्यावर कुणाचं लक्षंच नाही असं समजू नका. 'शेतकऱ्याच्या देठालाही हात लावता कामा नये' असं शिवाजी महाराज अधिकाऱ्यांना उद्देशूनच म्हणाले होते, ते आजही तंतोतंत खरे आहे."

VIDEO: विधानसभेत पाण्याच्या मुद्द्यावरून तुफान राडा, विरोधकांचा आक्रमक पवित्रा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading