Home /News /maharashtra /

'फजित तो खोटा शीघ्र होय', उमेदवारी नाकारलेल्या संभाजी महाराजांनी सेनेच्या 'वाघा'ला काय टोला मारला वाचा

'फजित तो खोटा शीघ्र होय', उमेदवारी नाकारलेल्या संभाजी महाराजांनी सेनेच्या 'वाघा'ला काय टोला मारला वाचा

राज्यसभा (rajyasabha election 2022) निवडणुकीच्या निकालानंतर छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhajiraje) यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

  कोल्हापूर, 11 जून : राज्यसभा (rajyasabha election 2022) निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार पराभूत (shivsena candidate loose) झाला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे (chatrapati sambhajiraje) यांचे ट्विट (tweet) चांगलेच लक्षवेधी ठरत आहे. भाजपच्या धनंजय महाडिक (mp dhananjay mahadik) यांच्या विजयाने कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्याला तिसरा खासदार मिळाला असला तरी संभाजीराजे यांच्या खासदारकीवरून शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही काळ शाब्दिक चकमक झाली होती.या सर्व पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांचे ट्विट पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता, मात्र शिवसेनेनं ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर आमची 42 मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी निकालानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत शिवसेनेवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्विट करत त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत,

  वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll

  तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll

   Rajya Sabha Election: धनंजय महाडिकांनी अखेर मैदान मारलं; वडिलांच्या विजयानंतर मुलगा भावूक

  'वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.' असा ट्विटचा अर्थ असून त्यामुळे संभाजीराजेंनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख कुणाकडे आहे हे लक्षात येते. 42 मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची चांगलीच फजिती झाली, हेच संभाजीराजे यांना सुचवायचे असून त्यांचे ट्विट आता चांगलेच व्हायरल झाले आहे. 

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Rajyasabha, Sambhajiraje chhatrapati, Sanjay raut, Shiv sena

  पुढील बातम्या