नाशिक, 09 जानेवारी : औरंगाबाद (Aurangabad) नामकरणाचा मुद्या आता दिवसेंदिवस पेटत चालला आहे. नाशिकमध्ये (Nashik) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दिशादर्शक फलकाला 'संभाजीनगर' असं बॅनर लावले होते. पोलिसांनी सर्व मनसेच्या कार्यकर्तांना ताब्यात घेतले आहे.
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरणाचं लोण आता नाशिकमध्ये पोहोचले आहे. जुन्या औरंगाबाद नाक्यावर मनसेनं आज दुपारी आंदोलन केले. यावेळी औरंगाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेल्या दिशादर्शक फलकाला 'छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता' असा फलक लावला होता.
भंडारा 10 बाळांच्या मृत्यू प्रकरणावरून फडणवीसांचा गंभीर आरोप
कोरोनाच्या परिस्थितीमुळे परवानगी नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी 12 मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फलक लावल्यानंतर पंचवटी पोलिसांनी ही कारवाई केली. तोपर्यंत पोलीस हे फक्त बघ्याची भूमिकेत होते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
पुण्यातही मनसे कार्यकर्त्यांनी बस स्थानकात आंदोलन
तर दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतरणासाठी आता पुण्याच्या ग्रामीण भागातून पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजगुरूनगर इथे मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत कार्यकर्त्यांसोबत राजगुरूनगर बस स्थानकातून औरंगाबादला निघालेल्या एसटी बसला छत्रपती संभाजी महाराजनगर असे फलक लावून आंदोलन केले.
सातत्याने महागणाऱ्या खाद्य तेलामुळे सामान्यांचं बजेट बिघडलं, कधी मिळणार दिलासा?
औरंगाबादच्या नामांतरासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरुन आंदोलनं केली जात असताना यात मनसेने ग्रामीण भागातून एसटी बसवर फलक लावून आंदोलन सुरू केले आहे. जो कोण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल त्यांच्या भूमिकेबद्दल मनसे पुढील काळात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.