पुणे, 12 जानेवारी : शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष कायमच राजकीय वर्तुळात चर्चेत राहिला आहे. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे जावई आणि अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बहिणीचे पती निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते आज पक्षात प्रवेश करतील.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच झेंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल. झेंडे यांचे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा सर्वच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी अंत्यत जवळचे संबंध आहेत. पण त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीची निवड केली आहे.
विजय शिवतारेंना देणार आव्हान
राष्ट्रवादीत आज प्रवेश करणार असलेले संभाजी झेंडे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आव्हान देणार आहेत. कारण पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवतारे यांच्याविरोधात झेंडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. झेंडे यांची विधानसभा तयारी आता पासूनच सुरूदेखील झाली आहे.
कोण आहेत संभाजी झेंडे ?
-नुकतेच निवृत्त आयएएस अधिकारी
-महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या काम पोस्टवर झेंडे यांची पोस्टींग
-एसआरए सीईओ, म्हाडा सीईओ, म्हाडा रिपेअरींग बोर्ड सीईओ, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यासह महत्त्वाच्या ठिकाणी काम
-मुंबईतील बीडीडी चाळ पुर्नविकासाचं महत्त्वाचं काम झेंडे यांनी केले.
VIDEO : 'संप न मिटवल्यास शिवसेना-भाजपला देशोधडीला लावू', मराठी माणूस संतापला