मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून वातावरण चांगलच तापलं. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी राजपालांना हटवण्याची मागणी केली होती. दरम्यान आता याच मुद्द्यावरून संभाजीराजे देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणात आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे. उदयनराजे यांचा निरोप नेमका कोणापर्यंत आणि काय पोहोचवला ते जाहीर करा, अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे.
प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
दरम्यान रविवारी भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल वादगस्त वक्तव्य केलं होतं. शिवरायांचा जन्म कोकणात झाला असं त्यांनी म्हटलं होतं. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्याचा देखील संभाजीराजे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. जरा तरी लाज ठेवा असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे मुर्खपणा आहे. त्यांच्यावर शिवभक्त हसत आहेत, असा घणाघात यावेळी संभाजीराजे यांनी केला आहे.
हेही वाचा : पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक
हर हर महादेव चित्रपटावर प्रतिक्रिया
त्यांनी यावेळी हर हर महादेव या चित्रपटावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हर हर महादेव हा चित्रपट इतक्या लवकर टीव्हीवर येतोच कसा? यामागे मेठे षडयंत्र असले पाहिजे असा आरोपही संभाजीराजे यांनी केला आहे.
हेही वाचा : दुकान बंद करून घरी निघाला पण पोहचलाच नाही; सराफा व्यापाऱ्यासोबत घडले भयंकर कृत्य
काय म्हणाले होते प्रसाद लाड?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तो वाद ताजा असतानाच भाजप नेते, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर रविवारी प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून आता पुन्हा एकदा वाद चिघळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.