मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले

संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ, उदयनराजेंनी टीका करणाऱ्यांना ठणकावले

'आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे'

'आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे'

'आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे'

  • Published by:  sachin Salve
सातारा, 06 जून : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे (sambhaji raje chhatrapati)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण, संभाजीराजे हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं स्पष्टपणे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle )यांनी ठणकावून सांगितले आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या. तसंच, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश;आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली करायचे वेश्याव्यवसाय मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिली आहे. हे सरकारचं अपयश आहे. आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवीची बाब आहे, सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजेंनी केली, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले. मराठा समाजातील लोक हे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे डोळे लावून आहेत. त्यामुळे उद्या जर लोकांचा उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. मराठा आरक्षणाचा मुद्या मार्गी लावण्यासाठी अधिवेशन बोलवण्याची गरज आहे, अशी मागणीही उदयनराजेंनी केली. चिमुकल्यांनी केला World Record; 800 कोटी वेळा पाहिला गेलेला VIDEO तुम्ही बघितला? तसंच. मराठा समाजाला इतर कोणत्याही जातीचे आरक्षण देऊ नका, मराठा समाजासोबत भेदभाव करू नका, जीआर काढून आरक्षण द्या, गायकवाड समितीचा अहवालाचे नीट वाचण झाले नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असावा, असंही उदयनराजे म्हणाले. संभाजीराजे रायगडावरून कडाडले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा आपणा लढा देत आहोत. काही लोकं नाराज झाले तरी चालतील, पण समाजाला वेी.ठीस धरणार नाही, कुणाचाही दिशाभूल करणार नाही. पण, आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आता कितीही नाराज झाले तरी चालतील, शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे. पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं संभाजीराजे म्हणाले.

Corona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. नेते आणि मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही  खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला. 'छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली.
First published:

Tags: रायगड, संभाजीराजे

पुढील बातम्या