संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट, मराठा आंदोलनात भांडणे लावणाऱ्यांना चपराक

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट, मराठा आंदोलनात भांडणे लावणाऱ्यांना चपराक

आज सकाळी त्यांनी नाशिकमध्ये राहणाऱ्या मनिषा राजेंच्या घरी पोहोचले.

  • Share this:

नाशिक, 28 सप्टेंबर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. संभाजी राजेंच्या या भेटीमुळे मराठा आंदोलनाच्या नेतृत्त्वावरून भांडणे लावणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली आहे.

खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी त्यांनी नाशिकमध्ये राहणाऱ्या मनिषा राजेंच्या घरी पोहोचले. मनिषा राजे यांनी भेटीसाठी आग्रह केला होता. त्यानंतर  संभाजीराजेंनी सदिच्छा भेट घेतली.

दरम्यान, नाशिकमध्ये 26 सप्टेंबर रोजी मराठा समाजाची राज्यस्तरिय बैठक झाली. या बैठकीला खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते. सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका, असा आदेशच खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या समर्थकांना दिले आहेत.

सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू, असंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असं आवाहन देखील संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथील मराठा आंदोलनाच्या राज्यस्तरिय बैठकीत दिला.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व मराठा संघटना एकाच छताखाली एकत्र आल्या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील तर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले होते.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2020, 12:59 PM IST

ताज्या बातम्या