Home /News /maharashtra /

मराठा आंदोलनाची पुढील रणनीती ठरली, दखल न घेतल्यास दिल्लीत 'क्रांती' मोर्चा

मराठा आंदोलनाची पुढील रणनीती ठरली, दखल न घेतल्यास दिल्लीत 'क्रांती' मोर्चा

मराठा समाजाला इडब्लूएसमध्ये आरक्षण नको, या लक्षवेधी ठरावासह 25 महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर

    नाशिक, 26 सप्टेंबर: भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक शनिवारी नाशिकमध्ये झाली. या बैठकीत मराठा आंदोलनाची पुढील रणनीती आखण्यात आली. येत्या 2 ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारनं मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मराठा समाजाला इडब्लूएसमध्ये आरक्षण नको, या लक्षवेधी ठरावासह 25 महत्त्वाचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्त्व करावं, असा विनंती करण्यात आली आहे. हेही वाचा...बँक घोटाळा! पुण्यात भाजपशी घरोबा केलेल्या आमदाराच्या 3 आलिशान गाड्या जप्त राज्यातील विविध मराठा संघटनांची राज्यस्तरीय बैठकाला खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील तर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत मंजूर झालेले 25 ठराव... 1.आर्थिक निकषांवर आरक्षण नको. (इडब्लूएस) आरक्षण नको. 2. प्रत्येक ग्रामपंचायतमार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे. 3. येत्या 2 ऑक्टोबरला खासदार, आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे. 4. मराठा क्रांती मोर्चातील तरुणांवर दाखल असलेले सर्व गुन्हे सरकसकट मागे घेणे. 5. सन 2019 मध्ये एमपीएससीमध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे. 6. अतिवृष्टीमुळे फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टरी 1 लाख व इतर पिकांसाठी 60 हजार रूपये भरपाई. 7. केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा. 8. येत्या 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे. 9. सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी. सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा. 10. राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी 12 टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. 11. सर्व स्तरातून येणाऱ्या निवेदनाचा मसूदा एकसारखा असावा. 12. प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी. 13. राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग 102 घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा. 14. राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून 50 टक्क्यांची मर्यादा रद्द/ संपविण्यासाठी करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा. 15. राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद(सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी 16. सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी. 17. आरक्षणाचा प्रश्न घटना दुरूस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजीत केला पाहीजे. 18.ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत.त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे.. 19. आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत.. 20. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत,आंदोलनाबाबत माध्यमांना माहीती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत..त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा. हेही वाचा...मोदींचं UN मध्ये भाषण : 'भारताला निर्णय प्रक्रियेतून किती काळ दूर ठेवणार?' 21. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी. 22. भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे.मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी 23. कुठल्याही मागास वर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही 24. आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत 25. महाराष्ट्रात 10 आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका खासदार संभाजीराजे यांनी सांगितलं की, सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका. सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू, असंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असा सल्ला देखील संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी दिला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितलं की, मी राजकारणी म्हणून नाही तर मराठा म्हणून येथे आलो आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा वंशज म्हणून बोलत आहे. मात्र आज शिवाजी महाराजांची आयडॉलॉजी कुठे गेली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. शरद पवार यांच्या भेटीवर संभाजीराजे यांनी सांगितलं की, मी छत्रपती म्हणून नाही तर मराठा समाजाचा घटक म्हणून शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. दिल्लीतल्या पहिल्या शिवजयंतीला स्वतः राष्ट्रपती उपस्थित होते. राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख, नौदलप्रमुख यांनी पायातले जोडे काढून महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं. शिवाजी महाराजांच्या नावाचा हा महिमा आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या