मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अबू आझमीला महाराष्ट्राबाहेर फेका, संभाजीराजे छत्रपती संतापले

अबू आझमीला महाराष्ट्राबाहेर फेका, संभाजीराजे छत्रपती संतापले

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे.

    मुंबई, 7 ऑगस्ट : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे,तर देशात राहण्याचा अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chatrapati) यांनी दिली आहे. अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? अशा व्यक्तीला पहिले महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे. त्यांची अशी बोलण्याची हिंमत होतेच कशी? असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. काय म्हणाले होते अबू आझमी? औरंगजेब हा वाईट राजा नव्हता. औरंगजेबाचा खरा इतिहास जनतेसमोर आणला तर कोणतीही हिंदू व्यक्ती नाराज होणार नाही. सध्या चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात आहे, असं अबू आझमी म्हणाले होते. महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद याचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला, यावर बोलताना अबू आझमी यांनी ही प्रतिक्रिया दिली. औरंगाबादमध्ये अनेक जणांचं नाव औरंगजेब आहे, असा दावाही अबू आझमी यांनी केला. 'राम पुनिया यांना भेटा, ते तर मुसलमान नाहीत. औरंगजेब चांगला मुसलमान होता याची अनेक उदारहणं त्यांच्याकडे आहेत. औरंगजेबने हिंदू-मुस्लिम यांच्यात लढाई केली नाही, असं ते म्हणाले होते,' असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या