जागा सेनेला गेली; भाजपच्या आमदाराला अश्रू अनावर, कार्यकर्तेही ढसाढसा रडले

लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला जाहीर झाल्यानं भाजपच्या रमेश कराड यांच्या समर्थकांना आणि मुंडे समर्थकांना मोठा धक्का बसला.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 10:12 PM IST

जागा सेनेला गेली; भाजपच्या आमदाराला अश्रू अनावर, कार्यकर्तेही ढसाढसा रडले

लातूर, 02 ऑक्टोबर : लातूर ग्रामीणची जागा सेनेला जाहीर झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना संभाजी पाटलांना अक्षरश: अश्रू अनावर झाले.

लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला जाहीर झाल्यानं भाजपच्या रमेश कराड यांच्या समर्थकांना आणि मुंडे समर्थकांना मोठा धक्का बसला. पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ समजले जाणारे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण मतदार संघात दोनवेळा पराभव पत्करून देखील पकड कायम ठेवली. शिवाय अनेक पक्षातल्या कार्यकर्त्यांना भाजपात घेऊन येण्याचा सपाटा सुरूच ठेवला.

मात्र, ऐनवेळी लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला गेल्यानं कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. भाजपनं हा निर्णय बदलावा यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी ठिय्या धरला आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संभाजी पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले आणि पालकमंत्र्यांसह कार्यकर्त्यात अश्रूंचा पूर आला. आता अश्रू अस्त्राचं हे राजकारण भाजपच्या रमेश कराडांना तारणार का हाच प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading...

तर लातूर ग्रामीणची जागा करडांना नाही दिल्यास जिल्ह्यात एकही भाजप उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2019 10:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...