संभाजी ब्रिगेड देखील लोकसभेच्या रिंगणात, 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

संभाजी ब्रिगेड देखील लोकसभेच्या रिंगणात, 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

संभाजी ब्रिगेडने राज्यातील 48 पैकी 11 लोकसभा मतदारसंघासह माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 13 मार्च: आगामी लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना या आघाडी व युतीसह अन्य काही पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यात प्रकाश आंबेडकरसह नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष देखील आहे. या सर्वांमध्ये आता आणखी पक्षाने उडी घेतली आहे. तो म्हणजे संभाजी ब्रिगेड होय.

संभाजी ब्रिगेडने राज्यातील 48 पैकी 11 लोकसभा मतदारसंघासह माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील घोषणा आज बुधवारी करण्यात आली. पंढरपूर येथे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण घाडगे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

कोणत्या मतदारसंघातून लढवणार निवडणूक

माढा, सोलापूर, औरंगाबाद, बुलढाणा, पुणे या प्रमुख लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले. माढ्यातून विश्वभर काशिद आणि सोलापूरमधून श्रीमंत मस्के यांची उमेदवारी संभाजी ब्रिगेडने जाहीर केली आहे.

VIDEO: हो मी निवडणूक लढणार - प्रिया दत्त

First published: March 13, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading