काकासाहेबाने ज्या पुलावरुन उडी घेतली, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडने घेतला 'हा' निर्णय

काकासाहेबाने ज्या पुलावरुन उडी घेतली, त्याबद्दल संभाजी ब्रिगेडने घेतला 'हा' निर्णय

संभाजी ब्रिगेडने कायगाव टोका पुलाचे स्मृतीषेश काकासाहेब शिंदे पूल असे नामकरण केले आहे.

  • Share this:

औरंगाबाद, ता. 24 जुलै : संभाजी ब्रिगेडने कायगाव टोका पुलाचे स्मृतीषेश काकासाहेब शिंदे पूल असे नामकरण केले आहे. मराठा आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतलेला तरूण काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती जपण्यासाठी पुलाला शिंदेचे नाव देऊन पुलाजवळ त्यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे.

अहमदनगर रोडवरील कायगाव इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 23 जुलै रोजी दुपारी जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथील गोदावरी पात्रावरील पुलावर त्यांनी हे आंदोलन केलं. पण हे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला.

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढाच!, शिवसेना आमदाराचा राजीनामा

आंदोलनासाठी जवळपास 50 ते 100 तरुण तिथे जमले होते आणि त्यांना आवरण्यासाठी पोलीस फौजफाटाही तिथे होता. काकासाहेब शिंदेना पोहता येत नसावे त्यामुळे नदीत उडी टाकल्यानंतर गटांगळ्या खाऊ लागला. त्याने हातपाय मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गोदापात्र खोल असल्यामुळे त्याचे प्रयत्न अपुरे पडले. तो जिवाच्या आकांताने हातपाय मारत होता. पण त्याची झुंज अपयशी ठरली आणि काही क्षणात त्याने जीव सोडला. काही आंदोलक काकासाहेबला वाचवण्यासाठी पुढे आले, पण त्याना कुणाला पुढे जाता आलं नाही. अवघ्या काही मिनिटात काकासाहेब शिंदेने आपला जीव सोडला.

हेही वाचा...

लोअर परेलचा पुल पादचाऱ्यांसाठी सुरु होणार?

Mumbai Band LIVE :नवी मुंबईत आंदोलनाचा भडका, पोलिसांची दोन वाहनं जाळली

चर्चेला तयार!,तीन दिवसांनंतर मुख्यमंत्री मराठा मोर्च्यावर बोलले

First published: July 25, 2018, 9:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading