...तर संभाजी भिडेंच्या विरोधात अटक वॉरंट काढणार

...तर संभाजी भिडेंच्या विरोधात अटक वॉरंट काढणार

तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते, या विधानावर संभाजी भिडे यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.

  • Share this:

नाशिक, 06 डिसेंबर : तो विशिष्ट आंबा खाल्ला की माणसाची पौरूष शक्ती वाढते आणि त्यामुळे पुत्रप्राप्ती होते या विधानावर संभाजी भिडे यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. आंबे खाल्यानं मुलं होतात हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर संभाजी भिडे यांच्या विरोधात कोर्टात पालिकेनं याचिका दाखल केली होती.

दरम्यान, भिडे हे सलग 3 तारखांना सुनावणीस गैरहजर होते. त्यामुळे पुढील तारखेला हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. जर भिडे हजर नाही राहिले तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आंबा पुराण

तो विशिष्ट आंबा खाल्ल्याने माणसाची सेक्स पॉवर वाढते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ही शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे.

मनुस्मृती

मी ज्ञानोबा आणि तुकोबांची मनूबरोबर तुलना केली नाही. माझं भाषण नीट समजून घ्या. राजस्थान हायकोर्टासमोर मनूचा पुतळा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे. ते ताज्य आहे तेवढंच घ्यायचं आणि बाकी सगळं टाकून द्यायचं असं सगळं सुरू आहे. राज्य घटनेवर माझा पूर्ण विश्वास आहे.

वारी करणारी 13वी पिढी

वारीची माझ्या घराण्यातली 13वी पिढी आहे. मला वारीत अशांतता निर्माण करायची नव्हती आणि नाही. आमचा वारकरी तसा नाही. केवळ काही लोक अपप्रचार करत आहेत. राजाभाऊ चोपदारांनीही माझी भूमिका समजून घेतली आहे.

संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल

First published: December 6, 2018, 1:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading