सिंहासनाच्या रक्षणासाठी हातात तलवारी असायला हव्यात - संभाजी भिडे

सिंहासनाच्या रक्षणासाठी हातात तलवारी असायला हव्यात - संभाजी भिडे

ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते. तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले.

  • Share this:

अहमदनगर, 10 जून : अहमदनगरचा उल्लेख 'अहमदनगर' नव्हे तर 'अंबिकानगर' असा करण्याचे आवाहन आज संभाजी भिडे यांनी केलं. ते अहमदनगरच्या टिळक रोड इथं झालेल्या सभेत बोलत होते.

तसंच सिंहासनाच्या रक्षणासाठी खरे तर या धारकऱ्यांच्या हाती तलवारी असायला पाहिजे होत्या. मात्र, त्यावरून लगेच लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल असंही ते म्हणाले.

रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी 'हिंदवी स्वराज्य खडा पहारा' तुकडी तयार करण्याची घोषणा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केली. या सभेला परवानगी द्यायला आंबेडकरी संघटनांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे आज कडकोट बंदोबस्तात ही सभा पार पडली. पण सभेच्या ठिकाणी आंबेडकरी संघटनांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.

नाशिकमध्येही आज संभाजी भिडेंची सभा आहे. त्याला आंबेडकरी जनतेचा विरोध आहे.

First published: June 10, 2018, 5:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading