भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी पुणे पोलीस सांगलीत; संभाजी भिडे सांगलीबाहेर

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशीसाठी पुणे पोलीस सांगलीत; संभाजी भिडे सांगलीबाहेर

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटांमध्ये दंगल झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. तर पिंपरी चिंचवड इथल्या पोलीस स्टेशनात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरूद्ध अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते

  • Share this:

22 मार्च:   भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी अधिक चौकशीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस पथक सांगलीत दाखल झालंय. पण या प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते संभाडी भिडे मात्र सांगलीत नसल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटांमध्ये दंगल झाली होती. या  घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. तर पिंपरी चिंचवड इथल्या पोलीस स्टेशनात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंविरूद्ध  अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.याप्रकरणी एकबोटेंना अटक झाली आहे तर भिंडेच्या अटकेची मागणी जोर धरते आहे. याचप्रकरणी चौकशीसाठी पुणे ग्रामीण पोलीसांचं एक पथक सांगलीत दाखल झालंय.

शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांची दोन तास चौकशीही त्यांनी केली. या तपासासंदर्भात गोपनियता बळगण्यात आलीय. दरम्यान सरकार संभाजी भिडे यांची चौकशी करत नसल्याचा प्रकाश आंबेडकरांनी आऱोप केला आहे. त्यांना अटक केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान संभाजी भिडे यांनी आंबेडकरांचे  सगळे आरोप फेटाळून लावलेत. उलट प्रकाश आंबेडकर यांनीच चुकीची वक्तव्य केल्याचा आरोप केलाय.तसंच त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या महिलांचीच चौकशी करा अशी मागणी केली आहे.

First published: March 22, 2018, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading