Home /News /maharashtra /

‘दारूची दुकाने सुरू आणि मंदिरं बंद, सरकारचं काय चाललं?’, भिडे गुरूजींचा निशाणा

‘दारूची दुकाने सुरू आणि मंदिरं बंद, सरकारचं काय चाललं?’, भिडे गुरूजींचा निशाणा

'आषाढी वारी ही परकीयांनीही बंद केली नव्हती मात्र ती यावर्षी बंद राहिली. कोरोनाची जास्त भीती निर्माण केली गेली आहे.'

    नृसिंहवाडी 9 नोव्हेंबर: राज्यात मंदिरांना उघडण्यास अजुन परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सरकारवर टीका करण्यात येत आहे. दिवाळीनंतर मंदिरं उघडण्यासंबंधी विचार करून असं सरकारने सांगितलं आहे. आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji bhide guruji) यांनी या मुद्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दारुची दुकाने उघडली हे समाजासाठी हितकारक आहे का असा सवाल केलाय. दारुची दुकाने हॉटेल्स सुरू आणि मंदिर बंद हे कसं काय असू शकते असा सवालही त्यांनी केला. लोकांना मानसिक शांततेसाठी मंदिरांची गरज असते. मात्र संध्या मंदिरांनाच बंद केलं गेलंय. दुकाने हॉटेल्स, बार सगळं काही सुरू आहे त्याने कोरोना वाढत नाही का असंही ते म्हणाले. जे काही वाईट आहे ते सरकार सर्व सुरू करत आहे अशी टीकाही त्यांनी केली. आषाढी वारी ही परकीयांनीही बंद केली नव्हती मात्र ती यावर्षी बंद राहिली. कोरोनाची जास्त भीती निर्माण केली गेली आहे. यात सगळ्या यंत्रणेचाच फायदा आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' (my family my responsibility)  या मोहिमेमुळे आपण कोरोना संसर्ग (Coronavirus) रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी सांगितलं. डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना देखील मुखमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. चीनसह या मोठ्या देशांनी दिल्या नाहीत बायडेन यांना विजयाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा, असेही त्यांनी सांगितलं
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या