एकादशीच्या दिवशी अमेरिकेने यान सोडले म्हणून यशस्वी झाले : संभाजी भिडे

एकादशीच्या दिवशी अमेरिकेने यान सोडले म्हणून यशस्वी झाले : संभाजी भिडे

भाजी भिडे यांच्या या अजब तर्कटामुळे पुन्हा एकदा ते टीकेचं लक्ष्य होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, 9 सप्टेंबर : 'अमेरिकेने आतापर्यंत 38 वेळा चंद्रावर उपग्रुह सोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही. तेव्हा नासाच्या वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह सोडला आणि तो यशस्वी झाला. अमेरिकेने एकादशी दिवशी उपग्रह सोडला म्हणूनच तो यशस्वी झाला,' असं विधान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्या या अजब तर्कटामुळे पुन्हा एकदा ते टीकेचं लक्ष्य होण्याची शक्यता आहे.

'भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नसून एक सेकंदांचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतसुद्धा भारतीय कालपमापन पद्धतीमध्ये आहे. अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांचा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाला,' असं संभाजी भिडे यांचं म्हणणं आहे.

नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभर दुर्गामाता दौड होणार आहे .त्यासाठी सोलापुरात आयोजित बैठकीला संभाजी भिडे आले होते. त्यावेळी त्यांनी हे एकादशी आणि अमेरिकेचा संबंध जोडला आहे.

संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधानांची मालिका

'आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन'

'विशिष्ट आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते. या आंब्यावर ऑस्ट्रेलियात संशोधन झालं आहे. त्यात या आंब्यात ती शक्ती असल्याचं सिद्ध झालं आहे. भारतातही अनेकांनी सशोधन केलं असून त्यातही ती गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यामुळे हे योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे,' असं म्हणत संभाजी भिडे यांनी मोठा वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर भिडेंवर राज्यभरातून चौफेर टीका झाली होती.

'मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली'

'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं हा इतिहास आहे आणि राज्यघटनाही आंबेडकरांनी मनुस्मृती वाचून लिहिली,' असा भिडेंनी केला होता. त्यानंतर अनेक अभ्यासकांनी हा दावा खोडून काढल्याने भिडेंची हे वक्तव्य निराधार असल्याचं सिद्ध झालं होतं.

'ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनू श्रेष्ठ'

'गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांपेक्षाही श्रेष्ठ होता,' असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं. त्यानंतर भिडे यांना राज्यभरातील लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.

वंचित-MIMच्या युतीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? पाहा VIDEO

First published: September 9, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading