सांगली, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा एकदा उभे ठाकले आहे. कोरोनाबाबत सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. पण सांगलीमध्ये (Sangali) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) यांनी चक्क शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांना तोंडावरील मास्क काढायला लावला. विशेष म्हणजे, संभाजी भिडे यांनीही तोंडाला मास्क लावला नव्हता.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यासह अन्य मान्यवर हजर होते.
यावेळी दुकानाला लावलेले रेबीन कापत असताना संभाजी भिडे यांनी अनिल बाबर यांना तोंडावरील लावलेला मास्क काढायला लावला. एवढंच नाहीतर 'कोरोना काही होत नाही मास्क काढा', असंही भिडे यांनी सांगितले. संभाजी भिडे यांनी सांगितल्यानंतर आमदार बाबर यांनी मास्क काढून टाकला.
विशेष म्हणजे, संभाजी भिडे यांनीच या कार्यक्रमात मास्क घातला नव्हता. त्यामुळे खानापूर मतदारसंघाच्या आळसंद गावाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी स्वतः मास्क न घालता आमदाराला मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ करावी. अशी मागणी सचिन खरात राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Covid19, Maharashtra, Sangali