भिडे गुरुजींवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा,अंनिसची मागणी

भिडे गुरुजींवर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा,अंनिसची मागणी

भिडे गुरुजींनी केलेलं वक्तव्य करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घाळण्यासारखे आहे

  • Share this:

पुणे, 11 जून : भिडे गुरुजींनी केलेलं वक्तव्य करणे म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घाळण्यासारखे आहे, त्यामुळे जादूटोणा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी अंनिसचे राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली.

माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भीमा कोरेगाव हिंसाचारातील आरोपी भिडे गुरूजी यांनी केला होता. भिडेंच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा: माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुलं होतात, संभाजी भिडेंचं अजब विधान

भिडेंनी असं वक्तव्य करणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हा जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यांचा व्हिडिओ तपासून त्यांचावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी मिलिंद देशमुख यांनी केली. तसंच असं अवैज्ञानिक वक्तव्य करणे यातून गुरुजींच्या समर्थकांनी बोध घेतला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही भिडेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत हा महिलांचा अपमान असल्याच म्हटलंय. अशा पद्धतीने वक्तव्य करणं विज्ञानाच्या विरोधात असल्याचं त्या म्हणाल्या.

 

संबंधीत बातम्या

मनूने जगाला पहिली घटना दिली- संभाजी भिडे

सिंहासनाच्या रक्षणासाठी हातात तलवारी असायला हव्यात - संभाजी भिडे

'धर्मनिरपेक्षता हे एक थोतांड आहे-संभाजी भिडे

First published: June 11, 2018, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading