Home /News /maharashtra /

ऐलान फाऊंडेशनसह सलमान खान उभारतोय कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी घर

ऐलान फाऊंडेशनसह सलमान खान उभारतोय कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी घर

ऐलान समूहाने फेब्रुवारी 2020 मध्ये महाराष्ट्रातील पूरग्रस्त खिद्रापूर गाव दत्तक घेण्याची घोषणा केली होती. हा प्रकल्प ऐलान फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड मेगास्टार सलमान खान यांचा संयुक्त उपक्रम आहे.

    कोल्हापूर,  7 सप्टेंबर :  2019 च्या पुराचा परिणाम कोल्हापुरातील 223 गावात झाला आणि जिल्ह्यातील सुमारे 28897 लोक विस्थापित झाले. फेब्रुवारी 2020 मध्ये, ऐलान समूहाने पूरग्रस्त खिद्रापूर गाव दत्तक घेण्याची घोषणा केली होती. आता तिथं घराची पुनर्बांधणी सुरू झाली आहे. हा प्रकल्प बॉलिवूडचा मेगास्टार सलमान खान, महाराष्ट्र सरकार आणि ऐलान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे . जिल्ह्यातील खिद्रापूर गावात पूरग्रस्तांसाठी 70 घरांचं बांधकाम सुरू झालं आहे. अशी माहिती मंत्री राजेंद्र पाटील यादवरावकर यांनी ट्वीट करत दिली. तिथं भूमिपूजन करण्यात आलं. सलमान खाननेही एका इन्स्टाग्राम पोस्टवर या उपक्रमाचं कौतुक केलं. गेल्या वर्षी आलेल्या महापूरात उद्ध्वस्त झालेल्या पीडितांना प्रत्येकी 250 चौरस फूट क्षेत्राची  70 घरं दिली जातील. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक घर रुपये 95,000 इतका निधी देणार आहे. तर उर्वरित खर्च सलमान खान आणि ऐलान फाऊंडेशन करणार आहेत. गावचे सरपंच हैदर खान मोकाशी म्हणाले की, "या विकासामुळे गावकरी अत्यंत आनंदित आहेत. राज्याच्या एका कोपऱ्यात असलेल्या या छोट्या गावात मदत केल्याबद्दल ऐलान फाउंडेशन आणि सलमान खानचा अभिमान आहे" हे वाचा - कोरोना काळात मुलांच्या जीवाशी खेळ, मुदत संपलेल्या दुधाचा केला पुरवठा "निवारा ही मूलभूत गरज आहे आणि ज्यांनी पुरामुळे आपले प्राण आणि घरे गमावली त्यांच्याबरोबर आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. ऐलान फाउंडेशन पूरग्रस्तांचं जीवन नव्याने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात पुनर्वसनसाठी वचनबद्ध आहे. समाजातील उपेक्षित वर्गाला मदत करण्याच्या दृष्टीकोनातून साकार होणाऱ्या बांधकामाची सुरुवात ही एक पाऊल आहे", असं ऐलान ग्रुपचे एमडी रवीश कपूर यांनी सांगितलं. हे वाचा - पुण्यातील जम्बो रुग्णालयाचं बदललं चित्र, काही दिवसांत असा झाला बदल ऐलान फाऊंडेशन ही गुरुग्राम आधारित व्यावसायिक रिअॅल्टी डेव्हलपर, ऐलान ग्रुपची एक परोपकारी संस्था आहे आणि क्रांतिकारक नावीन्यपूर्ण विकास करत आहेत . कोव्हिड 19 च्या या लॉकडाऊन दरम्यान बिहारच्या विविध भागातदेखील सामग्रीचं वितरण तसंच बांधकाम कामगारांना विनामूल्य रेशन, मास्क आणि सॅनिटायझर्स वाटप करून या संस्थेने मदत केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Kolhapur, Salman khan

    पुढील बातम्या