मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री; जळगावात मोठी कारवाई

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री; जळगावात मोठी कारवाई

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Jalgaon: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री (Sale fake injections) करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश (racket exposed) करण्यात आला आहे.

जळगाव, 12 डिसेंबर: शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री (Sale fake injections) करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश (racket exposed) करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मुंबईच्या गुप्तचर विभागाने जळगावात ही मोठी कारवाई केली आहे. आरोपी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या नावाखाली बनावट इंजेक्शनची विक्री करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक (Fraud) करत होते. संबंधित प्रकार औषधी कंपनीच्या निदर्शनास आल्यानंतर, कंपनीनं पोलिसांत तक्रार केली होती.

इंटास फार्मास्युटिकल कंपनीच्या तक्रारीनंतर, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मुंबईच्या गुप्तचर विभागाने संयुक्तपणे जळगावात मोठी कारवाई केली आहे. एफडीए आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. आरोपी मुंबईसह राज्यात सर्वत्र या बनावट इंजेक्शनची विक्री करत होते. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक नागरिक असे बनावट इंजेक्शन खरेदी करत होते.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

आरोपींकडून ग्लोबुसल इंजेक्शनच्या नावाखाली या बनावट इंजेक्शन विक्री सुरू होती. ग्लोबुसल इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या इंटास फार्मास्युटिकल कंपनीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर, कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मुंबईच्या गुप्तचर विभागाने बनावट इंजेक्शन विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

हेही वाचा-मेहनतीने मोठी डॉक्टर झाली पण एकटेपणाला कंटाळली; विषाची इंजेक्शने टोचून आत्महत्या

पोलिसांनी लाखो रुपये किमतीचे बनावट इंजेक्शन जप्त केले आहे. संपूर्ण राज्यात हे रॅकेट पसरलं असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे. संशयितांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Jalgaon