मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महिनाभरातच मोडला संसार; महाराष्ट्रातील नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

महिनाभरातच मोडला संसार; महाराष्ट्रातील नवोदित अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं इचलकरंजी येथील एका नवोदित अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू (Actress death in road accident) झाला आहे.

आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं इचलकरंजी येथील एका नवोदित अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू (Actress death in road accident) झाला आहे.

आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं इचलकरंजी येथील एका नवोदित अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू (Actress death in road accident) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

वाळवा, 28 जुलै: आपल्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना अपघात झाल्यानं इचलकरंजी येथील एका नवोदित अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू (Actress death in road accident) झाला आहे. दुचाकी घसरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भल्यामोठ्या दगडावर आदळल्यानं अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मृत अभिनेत्रीचा पतीही गंभीर जखमी (Husband injured) झाला आहे. जखमी पतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुरळप पोलीसांनी या अपघाताची नोंद करून घेतली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

पायल सागर बागडी (Payal Sagar Bagadi) असं अपघाती (Accident) निधन झालेल्या 26 वर्षीय अभिनेत्रीचं (Actress Death) नाव आहे. तर पती दिग्दर्शक सागर राजाराम बागडी (Director Sagar Bagadi) हे गंभीर जखमी झाले आहेत. जेवणासाठी गेल्यानंतर मित्राच्या घरी एक दिवस थांबून पहाटे पुन्हा घराकडे  परतत असताना हा अपघात घडला आहे. अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी त्यांचा विवाह (Marriage) झाला होता. पण या दुर्दैवी अपघातात पायल यांचा मृत्यू झाल्यानं त्यांचा महिना भराच्या आतच त्यांचा संसार उद्धवस्त झाला आहे. या घटनेनं कुटुंबीयांत आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-आजीला सांगून स्नेहा किचनमध्ये गेली अन् परत आलीच नाही, देहूरोडमधील दुर्दैवी घटना

वाळवा तालुक्यातील ठाणेपुडे येथील रहिवासी असणाऱ्या सागर बागडी यांचा इचलकरंजी येथील पायल शहा यांचा 5 जुलै रोजी विवाह झाला होता. दरम्यान सोमवारी 26 जुलै रोजी सागर आणि पायल दोघंही आपल्या मित्राकडे घनवट मळ्यात जेवणासाठी गेले होते. पण रात्री उशीर झाल्यानं दोघंही मित्राच्या घरीच थांबले. मंगळवारी सकाळी लवकर उठून पहाटे दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान करंजवडे डोंगरवाडी रस्त्यावरील पळूस ओढ्यावर दुचाकी घसरली. यामुळे पाठीमागे बसलेल्या पायल रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका मोठ्या दगडावर जाऊन आदळल्या. यातच त्यांचं निधन झालं आहे. तर सागर देखील गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात आणि एक पाय मोडला आहे.

हेही वाचा-सासू विहिरीत पडली, साडीचा पदर करून सून वाचवत होती, पण तिचाही गेला तोल

पायल आणि सागर दोघंही चित्रपट सृष्टीचे संबंधित होते. यातूनच त्यांची ओळख झाली होती. काही दिवसांपूर्वी सागर बागडी यांनी सैर नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. यामध्ये पायलनं मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान दोघांतील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह केला होता. त्यानंतर 5 जुलै रोजी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांनी त्याचा धार्मिक पद्धतीनं विवाह लावून दिला होता.

First published:

Tags: Bike accident, Death, Marathi actress, Sangali