महाराष्ट्रातील या चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईबाबांची कृपा !

महाराष्ट्रातील या चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईबाबांची कृपा !

शिर्डीच्या साईबाबांची कृपा त्यांच्या भक्तांवर कायम असते. तशीच कृपा आता महाराष्ट्राच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयांवरही झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : शिर्डीच्या साईबाबांची कृपा त्यांच्या भक्तांवर कायम असते. तशीच कृपा आता महाराष्ट्राच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयांवरही झाली आहे. कारण शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टने महाराष्ट्राच्या 4 वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी 1, 2 नाही तर तब्बल 17 कोटी रुपये दान केले आहे.

शिर्डी साईबाबा मंदिर ट्रस्टचे चेअरमन आणि भाजप नेते सुरेश हवारे यांनी सांगितलं की, मंदिर ट्रस्टने यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयांना आधुनिकीकरणासाठी 17 कोटी रुपये देऊ केले आहेत. कारण आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामीण भागातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

सुरेश हवारे यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकार्यांबरोबर एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यातया 4 महाविद्यालयांना निधी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुत्रांच्या माहितीनुसार, यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 13 कोटी, नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला 35 कोटी, औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 15 कोटी आणि चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 7.5 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा

VIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात

पत्नीने केली आत्महत्या, 8 तास मृतदेह गाडीत घेऊन फिरत होता पती

FIFA world Cup 2018 : आज एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या लढती

आता नवाजुद्दीन आपल्या बायकोला अजिबात घाबरत नाही!

First published: June 22, 2018, 2:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading