श्रीमंत देवस्थान असलेल्या साई संस्थानने केली कर्मचाऱ्यांची वेतन कपात

श्रीमंत देवस्थान असलेल्या साई संस्थानने केली कर्मचाऱ्यांची वेतन कपात

अनेक वर्ष वादानंतर जानेवारी महिन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के वेतनवाढ दिली गेली होती. त्यामुळे हजारो कर्मचारी सुखावले होते.

  • Share this:

शिर्डी, 02 जून : देशातल्या श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कर्मचाऱ्यांची 40 टक्के पगार कपात केली आहे. अगोदरच तुटपूंज्या पगारावर जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या शिर्डीच्या साई मंदीर प्रशासनाने साईसंस्थानच्या रूग्णालयात आणि इतर ठिकाणी सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतन कपात केली आहे. मुळातच तुटपूंज्या पगारावर अनेक वर्षापासून परिसरातील सुशिक्षित तरुण-तरुणी आपली सेवा इथे देत आहेत.  कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हे सर्वजण जिवापाड मेहनत करत आहेत मात्र, त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही.

हेही वाचा - 30 दिवसांत दिसणार 3 ग्रहणं, कुठे आणि कसं पाहता येणार? जाणून घ्या

अनेक वर्ष वादानंतर जानेवारी महिन्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के वेतनवाढ दिली गेली होती. त्यामुळे हजारो कर्मचारी सुखावले होते. मात्र, आता त्यांच्या आनंदावर विरझण पडले आहे. कोरोनाच्या या संकटकाळात साईबाबा संस्थानने कर्मचाऱ्यांची 40 टक्के वेतनवाढ कमी केल्याने हजारो कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. जे कर्मचारी घरी आहेत त्यांचा पगार कमी करणे ठीक आहे मात्र, आम्ही दिवसरात्र करूनही आमची पगार कपात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

साईसंस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर आणि आता कोरोना केअर सेंटरसारख्या अत्यावश्यक ठिकाणी काम करणाऱ्यांचे पगार कमी केल्याने आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -कोरोनाला हरवलं पण बाळ गमावलं, उपचाराविना 20 तास वेदना सहन करत होती महिला पण...

कोरोनाच्या या संकटकाळात राज्य सरकारला साईसंस्थानने 51 कोटींची मदत केली. कोरोना केअर सेंटर उभारले आहे. मात्र, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कमी करणे अन्यायकारक असून त्यांनी आपला निर्णय रद्द करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 12:07 PM IST

ताज्या बातम्या