शिवरायांच्या 'या' मावळ्यानं दुचाकीवरून केली 11 गडकिल्ल्यांची स्वारी!

शिवरायांच्या 'या' मावळ्यानं दुचाकीवरून केली 11 गडकिल्ल्यांची स्वारी!

या तरुणानं दुचाकीवरून फिरत चार महिन्यांत शिवनेरी, रायगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, सिंहगड यासारख्या तब्बल ११ गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.

  • Share this:

05 फेब्रुवारी : छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व सगळ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं आहे. छत्रपती शिवरायांची महत, त्यांचे लढवय्या स्वरूप त्यांच्याच गडकिल्ल्यावर ऐकायला कोणाला नाही आवडणार. बदलापुरात राहणाऱ्या सागर घाडगे या तरुणानं दुचाकीवरून फिरत चार महिन्यांत शिवनेरी, रायगड, प्रतापगड, वसंतगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, सिंहगड यासारख्या तब्बल ११ गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. विशेष म्हणजे स्वखर्चानं तो हे गडकिल्ले फिरतो आहे.

सागर एका बांधकाम व्यासायिकडे ड्राइव्हरचं काम करतो. त्याची आर्थिक परिस्थिती तशी नाजुक आहे. त्याच्या रोजच्या कामातून महिन्याला दोन सुट्या घेऊन तो दुचाकीवरून गडकिल्ल्यांवर पोहचतो. आणि तिथे येणाऱ्या प्रत्येकाला स्वतःजवळ असलेल्या गडकिल्ल्यांसंबंधी माहितीही देतो.

येत्या २ वर्षांत राज्यभरातील ३६५ किल्ल्यांना भेट देण्याचा सागरचा मानस आहे. त्यासाठी अनेकांकडून सागर मार्गदर्शनही घेतोय.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी उभारलेला हा वारसा आता सांभाळण्याची आणि त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे.

First published: February 5, 2018, 9:55 AM IST

ताज्या बातम्या