साध्वी प्रज्ञासिंगच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीकडून बालगंधर्व चौकात 'जोडे मारो आंदोलन'

साध्वी प्रज्ञासिंगच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीकडून बालगंधर्व चौकात 'जोडे मारो आंदोलन'

पुण्यात बालगंधर्व चौकात साध्वी प्रज्ञा सिह यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. एकीकडे नरेंद्र मोदी शहीदांचा अपमान करत मत मागत आहे.

  • Share this:

पुणे, १९ एप्रिल- भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर चौफेर टीका होत आहे.  तसेच सत्ताधारी भाजपवर विरोधकांकडून  सडकून टीका होत आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व चौकात साध्वी प्रज्ञा सिह यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. एकीकडे नरेंद्र मोदी शहीदांचा अपमान करत मत मागत आहे. भाजपमधील लोक अशाप्रकारे बेताल वक्तव्य करत आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि येत्या निवडणुकीत जनतेने यांना जागा दाखवावी.  संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साध्वी यांचा फोटो जाळून निषेध केला.

भाजपचा खरा चेहरा समोर आला, दहशतवाद्याला उमेदवारी देऊन शहिदांचा अपमान-नवाब मलिक

एका दहशतवाद्याला उमेदवारी देऊन भाजपने शहिदांचा अपमान केला आहे. मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला भाजपने भोपाळमधून उमेदवारी आहे.  26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्रज्ञा सिंह रुपात भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

प्रज्ञासिंह म्हणापुण्यात बालगंधर्व चौकात साध्वी प्रज्ञा सिह यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. एकीकडे नरेंद्र मोदी शहीदांचा अपमान करत मत मागत आहे. ल्या, हेमंत करकरेंना माझा शाप भोवला..

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझा शाप भोवला, असे साध्वी म्हणाल्या. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच सव्वा महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले, असेही त्यांनी म्हटले आहे. साध्वी यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याने त्यांची सुटका करावी, या प्रकरणी तपास करणाऱ्या पथकाने हेमंत करकरेंना विनंती केली होती.  पण आपल्याकडे प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध पुरावे आहेत. त्यामुळेच मी त्यांना या खटल्यातून मुक्त करणार नाही, असं हेमंत करकरे म्हणाले होते, याची आठवण साध्वी यांनी करून दिली.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading