'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा

'साध्वींना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार' - मा. गो. वैद्य यांनी दिला पाठिंबा

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तुरुंगात असताना ज्या यातना भोगल्या त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय प्रचारप्रमुख मा.गो. वैद्य व्यक्त केलं आहे.

  • Share this:

नागपूर, 20 एप्रिल : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी तुरुंगात असताना ज्या यातना भोगल्या त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय प्रचारप्रमुख मा.गो. वैद्य व्यक्त केलं आहे.

आरोप असलेल्या अनेक व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यामुळे साध्वी यांच्या उमेदवारीमध्ये आक्षेपार्ह काहीच नाही, असंही मा. गो. वैद्य म्हणाले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांनी साध्वींविरोधात कोर्टात खटला दाखल करावा, असंही त्यांचं म्हणणं आहे.

मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशाचा शाप भोवला, असं साध्वी म्हणाल्या होत्या. यानंतर शत्रूचा फायदा होऊ नये म्हणून मी माझं विधान मागे घेत आहे, असं साध्वींनी जाहीर केलं.

'आंबेडकरांनी मुख्यालयात यावं'

साध्वींच्या या वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे. साध्वी प्रज्ञासिंह या कसाबप्रमाणेच दहशतवादी आहेत, पोलिसांकडेही जी शस्त्रं नाहीत ती संघाकडे आहेत,अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यालाही मा. गो. वैद्य यांनी उत्तर दिलं. प्रकाश आंबेडकरांनी संघ मुख्यालयात येऊन स्वत: तपासावं, असं आवाहन त्यांनी केलं.

हिंदू हा केवळ धर्म नाही तर तो व्यापक विचार आहे. राजकारण्यांनी हिंदू धर्माकडे व्यापक अर्थाने न पाहता 'हिंदू दहशतवाद' अशी संकल्पना पेरण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही मा. गो. वैद्य यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. सोनिया आणि राहुल गांधी हेही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात जामिनावर सुटले. मग त्यांच्या उमेदवारीला आक्षेप का घेत नाही, असा सवालही त्यांनी विचारला.

=======================================================================

VIDEO: काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा हटके प्रचार; व्हिडिओ व्हायरल

First published: April 20, 2019, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading