'उद्धव ठाकरे राजकारण थांबवा, माझे राज्य माझी जबाबदारी ओळखा', पीयूष गोयल यांची टीका

राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ आली असून, त्यांनीही 'माझे राज्य, माझी जबाबदारी' पार पाडवी असं गोयल यांनी म्हटलं आहे.

राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ आली असून, त्यांनीही 'माझे राज्य, माझी जबाबदारी' पार पाडवी असं गोयल यांनी म्हटलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 17 एप्रिल :  ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये (State vs Center) आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री (Piyush Goel attacked Uddhav Thackeray)पीयूष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून राजकारण (Politics over oxygen) करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच 'माझं राज्य, माझी जबाबदारी' ओळखा असा टोलाही पीयूष गोयल यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. पीयूष गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले हे की, उद्धव ठाकरे सरकार ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून करत असलेलं नाटक दुःखद आहे. भारत सरकार सर्व उत्पादकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादनाचा प्रयत्न करत आहे. सध्या आपण क्षमतेपेक्षा जास्त 110 टक्के ऑक्सिजन उत्पादन करत आहोत. औद्योगिक वापराचा ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी वापरत आहोत, असंही गोयल यांनी सांगितलं. (वाचा -महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा!, आव्हाडांची नरेंद्र मोदींकडे विनंती ) महाराष्ट्रालाच सर्वाधिक ऑक्सिजन आतापर्यंत भारतात सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाला आहे. केंद्र राज्य सरकारांशी रोज संपर्कात असून शक्य तेवढी मदत करत आहे. पंतप्रधानांनी नुकतंच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्रानं एकत्रितरित्या काम करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. एवढं सर्व असतानाही उद्धव ठाकरे सरकार याचं राजकारण करत असल्याचं पाहून वाईट वाटल्याचं पीयूष गोयल म्हणाले आहेत. अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार उद्धव ठाकरेंवर पीयूष गोयल यांनी यावेळी जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या रोजच्या निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवून आता जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचं गोयल म्हणाले. महाराष्ट्र सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकारच्या तावडीत असून, केंद्र सरकार लोकांसाठी शक्य तेवढे चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. (वाचा-'महाराष्ट्राला Remdesivir दिल्यास परवाना रद्द करू,केंद्राची निर्यातदारांना धमकी') जबाबदारी ओळखा राज्य सरकारच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीमेचा उल्लेख करतही गोयल यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील लोक अत्यंत कर्तव्यनिष्टपणे त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आता राज्यातील मुख्यमंत्र्यांनीही त्यांची कर्तव्ये पूर्ण करण्याची वेळ आली असून, त्यांनीही 'माझे राज्य, माझी जबाबदारी' पार पाडवी असं गोयल यांनी म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: