सदाभाऊंच्या संघटनेची घटस्थापनेला घोषणा,राजू शेट्टींविरोधात लोकसभा लढवणार

सदाभाऊंच्या संघटनेची घटस्थापनेला घोषणा,राजू शेट्टींविरोधात लोकसभा लढवणार

'संवादाकडून संघर्षाकडे' असं संघटनेचं ब्रिदवाक्य असणार असल्याचंही सदाभाऊंनी सांगितलं.

  • Share this:

18 सप्टेंबर : स्वाभिमानी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या नव्या पक्षाची अखेर मोर्चेबांधणी पूर्ण केलीये.  घटस्थापनेला म्हणजेच 21 सप्टेंबरच्या मुहूर्तावर नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार आहेत. 'संवादाकडून संघर्षाकडे' असं संघटनेचं ब्रिदवाक्य असणार असल्याचंही सदाभाऊंनी सांगितलं. तसंच हातकणंगलेतून राजू शेट्टी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिलेत.

​ घटस्थापनेच्या दिवशी नव्या संघटनेची घोषणा करणार असल्याचे, राज्य कृषी आणि पनण राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलंय.  मी गावापासून 200 किमी अंतरावर जाऊन 5 लाख मतं मिळवू शकतो, हातकणंगले तर माझा घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या मतदारसंघातच आपण आगामी लोकसभा लढवणार असल्याचे संकेत देखील सदाभाऊंनी यावेळी दिले.

21 तारखेला घटस्थापनेदिवशी नव्या संघटनेच्या नावाची घोषणा करणार असून येत्या 30 तारखेला इचलकरंजी येथे दसरा मेळावा घेऊन त्या मेळाव्यातच यंदाच्या ऊस दराची घोषणा करणार आहे आणि तोच दर यंदाचा ऊसदर असेल असंही सदाभाऊंनी स्पष्ट केलं.

मी चळवळीतून वाढलेला कार्यकर्ता आहे आणि मी लढू शकणार नाही असं म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपण संघटना काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या संघटनेचे ब्रिदवाक्य संवादातून संघर्षाकडे असे असेल असं म्हणत त्यांनी पहिल्यांदा संवाद साधला जाईल आणि प्रतिसाद न मिळाल्यास संघर्ष केला जाईल असं सांगितलं.

First published: September 18, 2017, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading