मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय, सदाभाऊंनी केली राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय, सदाभाऊंनी केली राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

'एक देश एक बाजारपेठ' अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक

'एक देश एक बाजारपेठ' अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक

'एक देश एक बाजारपेठ' अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक

नाशिक, 16 सप्टेंबर: कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर उतरले. निर्यात बंदी न उठविल्यास लिलावासाठी कांदा न आणण्याचा शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे माजी राज्य कृषीमंत्री आणि रयत क्रांती संघटना अघ्यक्ष सदाभाऊ खोत यांनी उद्यापासून (17 सप्टेंबर) राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

कांदा निर्यातबंदी निर्णय हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा निर्णय असल्याचं सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं. निर्यातबंदी हा सुटाबुटातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा...कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार वाढले! देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, केंद्र सरकारचा कांदा निर्यातबंदी निर्णय अन्याय करणारा आहे. सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अमान्य आहे. शेतकऱ्यांचा हा काळ संकटाचा आहे. या काळात त्यांना मदत द्यायची वेळ आली आणि त्यांच्या तोंडाशी आलेला घास सरकारनं काढून घेतला आहे. मुंबई, मद्रास, बांग्लादेश सीमेवर माल पोचल्यानंतर थांबवणं चुकीचं असल्याचं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलं.

सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की, हा माल एक्स्पोर्ट झाला नाही तर सडून जाईल. हा माल तत्काळ एक्स्पोर्ट करण्याची केंद्रानं परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 5 जूनला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुक्त बाजारपेठेची घोषणा केली होती. त्यानंतर शेतकरी आनंदी झाला होता. मात्र, 'एक देश एक बाजारपेठ' अशी केंद सरकारची घोषणा अवघ्या 3 महिन्यांत हवेत विरली, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असा घणाघात देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

अध्यादेश खरा की मंत्र्याची घोषणा खरी? असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांचा मुडदा पाडणारा आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

उद्यापासून आमचं राज्यव्यापी आंदोलन आहे. कारण या सरकारच्या काळात शेती करणं अवघड झालं आहे. शेतीचं सरकारीकरण करा, शेतकरी काम करतील, तेवढा पगार द्या, आता सरकारनंच ठरवावं की शेतकऱ्यांना मुक्त कसं करायचं, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांची सरकारवर उपरोधिक टीका केली आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला अखेर मिळाली मजुंरी

चक्रीवादळ, लॉकडाऊनमुळं शेतकरी उद्धवस्त...

राज्यात आलेलं चक्रीवादळ आणि कोरोना लॉकडाऊनमुळं शेतकरी आधीच उद्धवस्त झाला आहे. आम्हाला भीक नको न्याय द्या, अन्यथा आंदोलन अजून आक्रमक होईल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी मोदी सरकारला दिला आहे. -

First published:

Tags: Onion, Sadabhau khot