सदाभाऊ खोत करणार नवीन पक्षाची घोषणा; पक्षाच्या नावाबद्दल सर्वत्र उत्सुकता

सदाभाऊ खोत करणार नवीन पक्षाची घोषणा; पक्षाच्या नावाबद्दल सर्वत्र उत्सुकता

दुपारी 1 वाजता कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यामधूनच नव्या संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे

  • Share this:

कोल्हापूर,21 सप्टेंबर: आजचा घटस्थापनेचा दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा दिवस असणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी झाल्यानंतर राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे आपल्या नवीन संघटनेची आज घोषणा करणार आहेत. दुपारी 1 वाजता कोल्हापूरमध्ये सदाभाऊ खोत समर्थकांचा मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यामधूनच नव्या संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत सदाभाऊ खोत होते पण या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालं. त्यानंतर सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दूर झाले. कोल्हापूरमधील आजच्या मेळाव्यात सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांच्यावर काय टीका करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसंच त्यांच्या संघटनेचे नाव काय असणार याबाबत ही मोठी उत्सुकता आहे.

नव्या शेतकरी संघटनेची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी पक्षाची एक मसुदा समिती स्थापन केली होती. ही मसुदा समिती संघटनेचं नाव, झेंडा, नियमावली ठरवून याबाबतचा अंतिम अहवाल देणार होती. आज संघटनेच्या प्रमुख 21 पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली जाईल.

First published: September 21, 2017, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading