मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत यांनी सांगितलं माघारीचं कारण, फडणवीसांबद्दल म्हणाले...

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत यांनी सांगितलं माघारीचं कारण, फडणवीसांबद्दल म्हणाले...

भाजप पुरस्कृत आघाडीचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले

भाजप पुरस्कृत आघाडीचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले

भाजप पुरस्कृत आघाडीचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले

  • Published by:  Sandeep Shirguppe

सोलापूर, 17 जून : नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha election) भाजपने महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का दिला. (bjp, mahavikas aghadi)  यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत (mlc election) महाविकास आघाडीकडून सावध भुमिका घेतली जात आहे. दरम्यान भाजपकडूनही नवी रणनिती (bjp new strategy) आखण्याचे काम सुरू आहे. भाजप पुरस्कृत आघाडीचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घ्यावी लागली. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, भाजपला विधानपरिषदेसाठी (bjp mlc election candidate) 6 वी जागा जिंकणे कठीण असल्याने मला माघार घेण्यास सांगितले.

खोत पुढे म्हणाले की, विधानपरिषदेच्या सहा जागा जिंकण्यासाठी भाजपकडे मतांची बेरीज होत नव्हती म्हणून मला देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेण्यास सांगितले. भविष्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता येणार आहे. भाजप ज्यावेळी सत्तेत येईल त्यावेळी मला ते नक्कीच संधी देतील मला ते वाऱ्यावर सोडणार नाहीत असे सदाभाऊ म्हणाले.पंचायतराज समितीच्या दौऱ्यानिमित्त सदाभाऊ खोत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : Nitin Gadkari : चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, काय आहे गडकरींचा प्लॅन

ते म्हणाले, मी मैदानावरील कार्यकर्ता आहे. त्यामुळे कधीही संपणार नाही. लढणे आणि संघर्ष करणे आपले काम आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कायम रस्त्यावर उतरुन काम करण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे आमदार असलो काय आणि नसलो काय, राज्य फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणे महत्वाचे आहे. ते म्हणाले, राजकारणात अनेक मंडळी सदरेवर हुजरेगिरी करीत असतात त्यापैकी मी नाही. त्यामुळे सत्ता आल्यानंतर माझा विचार होईलच. विधानपरिषदेच्या निवडणुकीत गतवेळी भाजपाच्या सहा जागा होत्या. 

त्यामुळे सुरुवातीला सहा जागेवर उमेदवार उभे करणे गरजेचे असल्याने फडणवीस यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. मात्र मतांची गोळा बेरीज केल्यानंतर सहावी जागा निवडून येणे कठीण होते. त्यासाठी पराभव नको म्हणून माघार घेतली.

हे ही वाचा : Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?

खोत यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चौफेर टिका केली. महाविकास आघाडीत सध्या समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे सर्वाधिकार राष्ट्रवादीच्याच नेत्यांना आहेत. शिवसेना नावालाच सत्तेत असल्याचीही टीका माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Sadabhau khot