भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची पहिली प्रतिक्रिया

भाजप-शिवसेनेच्या संघर्षावर सदाभाऊ खोत यांची पहिली प्रतिक्रिया

दोन प्रमुख पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे लढले. मात्र निवडणूक निकालानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे या दोन्ही पक्षांत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीत शिवसेना आणि भाजपसोबत महायुतीत इतरही काही घटकपक्ष होते. त्यामुळे आता या दोन प्रमुख पक्षात वाद निर्माण झाल्यानंतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यातच सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

'शिवसेनेनं घेतलेली भूमिका पूर्णपणे चुकीची आहे. वरिष्ठ पातळीवर सत्तावाटपावरून ज्या चर्चा झाल्या, त्यामध्ये 50-50 चा सूर निघाला. पण जर 50-50 ठरलं असेल तर जागाही तेवढ्या यायल्या हव्यात ना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे घटकपक्ष म्हणून निवडणूक निकालानंतरही आमच्याशी चांगला संवाद ठेवला. त्यामुळे आमची इच्छा होती की ही महायुती टिकावी,' असं म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तासंघर्षावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, सध्या संपूर्ण देशाचं महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींकडे लक्ष लागले आहे. विधानसभेचा निकाल लागून 18 दिवसांचा कालावधी उलटला तरी राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत भाजप-सेनेत वाद झाल्यानंतर राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. पण भाजपने आपल्याकडे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याचं सांगत सरकार स्थापन करण्यात असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी सेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळ दिला आहे.

शिवसेना जरी मुख्यमंत्रिपदाबाबत अखेरपर्यंत ठाम असतानाही भाजपने मात्र अखेरपर्यंत वेट अँड वॉच भूमिका घेतली. आता मुनगंटीवार यांनी कोअर कमिटीच्या बैठकीआधी शिवसेनेबाबत भाजपची भूमिका संध्याकाळी 7.30 ते 8 वाजता मांडली जाणार असल्याचं म्हटलं आहे. आता भाजप आणखी काय भूमिका घेणार याकडं लक्ष लागलं आहे.

सत्तासंघर्षात भाजपकडून नवी खेळी; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, पाहा UNCUT VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या