बगलबच्च्यांना लगाम घाला अन्यथा..,सदाभाऊंचा राजू शेट्टींना इशारा

बगलबच्च्यांना लगाम घाला अन्यथा..,सदाभाऊंचा राजू शेट्टींना इशारा

राजू शेट्टी यांची इच्छा असेल तर मी आत्मक्लेश यात्रेपासून दूर राहीन असंही सदाभाऊ खोतांनी स्पष्ट केलं

  • Share this:

13 मे : खासदारांनी आपल्या आजुबाजूला असलेल्या बगलबच्च्यांना लगाम घालावा अन्यथा या हुजऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराच कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. तसंच  राजू शेट्टी यांची इच्छा असेल तर मी आत्मक्लेश यात्रेपासून दूर राहीन असंही खोतांनी स्पष्ट केलं. ते कोल्हापुरात बोलत होते.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेतील वाद आता आणखी चिघळलाय. खासदार राजू शेट्टी यांच्यावर सदाभाऊ खोत पहिल्यांदाच बोललेत. खासदारांनी आपल्या आजुबाजूला असलेल्या बगलबच्च्यांना लगाम घालावी अन्यथा या दरबारातील हुजऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा त्याची व्यवस्था करावी लागेल असा इशारा सदाभाऊंनी दिली.

सदाभाऊ मळलेल्या वाटेने कधीच जात नाही स्वतःची वाट स्वतः तयार करतो असा गर्भित इशाराही त्यांनी दिलाय. राजू शेट्टी यांची इच्छा असेल तर आत्मक्लेश यात्रेपासून दूर राहतो. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या टीका टिप्पणी सुरू आहेत ते बघितल्यानंतर खेद वाटतो. भविष्यात काय दडलेल आहे हे मला माहिती नाही असंही खोत म्हणालेत.

एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सर्व काही आलबेल असल्याचा खुलासा केला जात होता पण तो आता साफ फोल ठरलाय. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे स्वाभिमानाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading