जानकरांची वक्तव्यं गंभीरपणे घेण्यासारखी नसतात, सदाभाऊंचा पलटवार

जानकरांची वक्तव्यं गंभीरपणे घेण्यासारखी नसतात, सदाभाऊंचा पलटवार

त्यांच्या वक्तव्याबद्दल टेन्शन न बाळगता पुढे काम करत राहायचं असतं असा टोला सदाभाऊ खोत यांनी जानकरांना लगावला.

  • Share this:

06 मे : महादेव जानकर यांची कोणती ही वक्तव्य ही गंभीरपणे घेण्यासारखी नसतात, त्यांच्या वक्तव्याबद्दल नो टेन्शन बाळगुण पुढे काम करत राहायचं असतं असा टोला कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.

आपल्या बेधडक वक्तव्यामुळे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर नेहमी या ना मार्गे चर्चेत असतात. पंढरपुरमध्ये बोलताना त्यांनी आपल्याच घटक पक्षाच्या नेत्यांवर शिवराळ भाषेत टीका केली.

स्वाभिमानी संघटनेत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वादावर जानकर यांनी दोघांच्या वादात आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं सांगत बैलगाडी जेव्हा चालते तेव्हा त्या खालच्या कुत्र्याला वाटते की मी गाडी ओढतो, असा टोला लगावला होता.

अखेर त्याला सदाभाऊ खोत यांनीही आपल्या शैलीत पलटवार केला. महादेव जानकरांच्या वक्तव्याला महत्व द्यायची गरज नाही असं म्हणत  नामउल्लेखानं टाळलं. तसंच त्यांच्या वक्तव्याबद्दल टेन्शन न बाळगता पुढे काम करत राहायचं असतं असा टोलाही लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 09:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading