मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'करंटे-पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर Maratha Reservation रद्द झाले', सदाभाऊंचा तोल सुटला, अशोक चव्हाणांवरही आगपाखड

'करंटे-पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर Maratha Reservation रद्द झाले', सदाभाऊंचा तोल सुटला, अशोक चव्हाणांवरही आगपाखड

Sadabhau Khot Maratha Reservation अशोक चव्हाणांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असा टोला मारत चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत असल्याचं खोत म्हणाले. प्रस्थापित मराठा नेत्याला आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 15 मे : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मराठा आरक्षण दिलं. पण हे करंटे, पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि आरक्षण रद्द झालं अशा शब्दात खोत यांनी संताप व्यक्त केला. मराठा आरक्षण आणि अशोक चव्हाण (Adhok Chavan) यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी खोत यांनी पत्रकार परिषद (Sadabhau Khot Press conference) घेत भाष्य केलं.

(वाचा-Cyclone Tauktae: मुंबईतील 3 कोविड सेंटरमधून 400 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवले)

राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा लढा लढताना विरोधी पक्ष, वकिलांची मते घेतली नाही, कोर्टात योग्य बाजू मांडली नाही, किंवा गायकवाड समितीमधील महत्वाचे पुरावेही जोडले नाहीत. त्यामुळं फडणवीस यांनी दिलेलं मराठा आरक्षण हे करंटे, पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर आरक्षण रद्द झाले, असं खोत म्हणाले. केंद्राप्रमाणं राज्यसरकारनंही कोर्टात याचिका का दाखल केली नाही, असा सवालही त्यांनी केला.

अशोक चव्हाणांवर हल्लाबोल

सरकारमधील मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनाच विस्थापित मराठ्यांना आरक्षण द्यायचे नसल्याचा आरोप करत सदाभाऊ खोत यांनी अशोक चव्हाणांवर प्रहार केला. अशोक चव्हाणांचा आदर्श घेण्यासारखा आहे, असा टोला मारत चव्हाण वेड्याच्या रुग्णालयात जायच्या अवस्थेत असल्याचं खोत म्हणाले. प्रस्थापित मराठा नेत्याला आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

(वाचा-आईच्या उपचारासाठी Plasma हवा होता, तरुणाला ऑनलाइन प्रतिसादही मिळाला पण...)

एकेकाळी तुम्ही मुख्यमंत्री होता आणि आता तुम्हाला दोन नंबर, तीन नंबर नाही तर भीक मागुन खातं मिळवावं लागतं.

कोतवालसुद्धा तुमच्या पेक्षा स्वाभिमानी असतो. चव्हाणांमुळं मुख्यमंत्र्यांचा कोतवाल झाल्याचं महारष्ट्रानं पाहिलं असंही खोत म्हणाले. अरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाज मागासलेला कसा आहे याची नव्यानं मांडणी करावी लागेल. त्याचे पुरावे गोळा करावे लागतील, चे गोळा करायला कोण येणार आहे?

प्रस्थापित मराठा नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला खोत यांनी दिला. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ कुठे आहे? असा सवालही त्यांनी केला. एकूणच आरक्षणावरून हल्लाबोल करताना सदाभाऊ खोत यांचा निशाणा अशोक चव्हाणांवरच असल्याचं पाहायला मिळालं.

First published:

Tags: Ashok chavan, Devendra Fadnavis, Maratha reservation, Sadabhau khot, मराठा आरक्षण maratha aarakshan