'शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, करावं तसं भरावं लागतं'

'शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, करावं तसं भरावं लागतं'

'शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल. त्याचं दु:ख पवारांना कळेल.'

  • Share this:

असीफ मुरसल, सांगली 2 ऑगस्ट : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजप आणि शिवसेनेत जाण्यासाठी राज्यात लाट आल्याने राजकीय विरोधा पक्षांना राजकीय हादरे बसत आहेत. याच सर्वाधिक नुकसान झालंय ते राष्ट्रवादी काँग्रेसचं. दोन तीन नेते गेले म्हणून काही पक्ष संपत नाही, ज्यांना भाजपमध्ये जायचं असेल त्यांना शुभेच्छा अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली होती. पवारांच्या या टीकेला मंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिलंय. आत्तापर्यंत शरद पवारांनी दे पेरलं तेच उगवलं. राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे अशी टीका त्यांनी सांगलीत बोलताना केली.

धक्कादायक : नाशिकमधून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुलींचं अपहरण

सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवारांनी आतापर्यंत अनेकांचे पक्ष फोडले, मात्र आज त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष त्याच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही म्हण आपल्याकडे चांगली प्रचलित आहे, जे पवार साहेबांनी पेरलं तेच उगवलं आणि हे सर्व पवारांना पाहण्याचं भाग्य देखील लाभलं अशा शब्दत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

नवऱ्याला सोड..माझ्यासोबत राहा, असं सांगून विवाहितेला दारू पाजून केला बलात्कार

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं आत्तापर्यंत बोललं जातं, त्यावेळी वसंतदादा पाटील यांना किती दुःख झाले असेल. त्यामूळे आता शरद पवार यांच्या पक्षात जे घडतंय ते फार वेगळं घडतंय असं नाही असं म्हणत खोत यांनी वसंतदादा-शरद पवार यांच्या वादाची आठवण करून दिली.

भूमिपुत्रांना नोकरीत 80 टक्के प्राधान्य देणारे महाराष्ट्र पहिले राज्य

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. जे चांगले लोक आहेत आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेल्या अशा चांगल्या लोकांना निश्चितपणानं भाजपात काम करण्याची संधी देण्याची भूमिका या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे असे सांगत राष्ट्रवादीतील जी चांगली मंडळी भाजपात येत आहेत त्याना मी धन्यवाद देतो असेही खोत म्हणाले.

महाराष्ट्रातील विरोधकांच्या दुकानांना सध्या कुलप लागली आहेत, त्यामुळे  त्यांच्या दुकानदार्‍या आता बंद झाल्या आहेत अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी ईव्हीएम वरून भाजप सरकारवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 2, 2019, 3:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading