मुंबई, 25 ऑगस्ट : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच अनेक राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यातच आता माजी कृषी राज्य मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.
सध्या ते क्वारंटाईन झाले असून काही तासांपूर्वी ते एका अलगिकरण कक्षाच्या लोकार्पण सोहळ्याचा उपस्थित राहिले होते. याबाबत 11 तासांपूर्वी त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. शिराळा तालुक्यात आरोग्य विभागात त्यांच्या स्थानिक विकास निधीतून फिरते कोविड अलगिकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे, त्याच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित होते.
काही तासांपूर्वी ते शिराळा येथील लोकार्पण सोहळ्यात सहभागी झाले होते. आरोग्य विभागाला वैद्यकीय साहित्य व उपकरणे देण्याच्या उद्देशाने सदाभाऊ खोतांनी स्थानिक विकास निधीतून फिरते कोविड संस्थात्मक अलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी कोविड केअर सेंटर, शिराळा जिल्हा सांगली येथे झालेल्या साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झाले होते.
हे वाचा-‘मास्क’ न वापरणाऱ्या लोकांमुळेच भारतात पसरतोय कोरोना, ICMRने दिला गंभीर इशारा
यावेळी जिल्हा प.सदस्य सम्राटबाबा महाडिक, रणधीर नाईक, तहसीलदार शिंदे, बीडीओ बागल, डॉ. रावळ, भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, रयत क्रांती संघटना तालुकाध्यक्ष सत्यजित कदम, जयसिंह शिंदे, सुमंत महाजन, नगरसेवक केदार नलावडे, संतोष शेटे, निलेश शेटे, जावेद नदाफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.