कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा

श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाण्यातील चिखली इथल्या योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2017 04:04 PM IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा

16  एप्रिल : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.  श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाण्यातील चिखली इथल्या योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सदाभाऊ खोत शनिवार आणि रविवार बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शनिवारी अकोला इथे त्यांनी सभा घेतली. त्यानंतर दुपारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात त्यांची कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा पार पडली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव इथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली इथे मुक्कामासाठी निघाले.

डोणगाववरून चिखलीला येत असताना अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना चिखली इथल्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...