सातबारा नावावर असणाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क-सदाभाऊ खोत

ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना नव्या कायद्याद्वारे मतदानाचा अधिकार देणार असल्याचं सुतोवाच राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2017 06:57 PM IST

सातबारा नावावर असणाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क-सदाभाऊ खोत

11 एप्रिल : येणाऱ्या काळात राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सरपंच, व्यापारी, तसंच विकास सोसायटी सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार नसून, ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे.

त्या सर्व शेतकऱ्यांना नव्या कायद्याद्वारे मतदानाचा अधिकार देणार असल्याचं सुतोवाच राज्याचे कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं. ते धुळे जिल्ह्या दौऱ्यावर आले असता बोलत होते.

60 वर्षे सत्तेत असतांना विरोधकांवर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ का आली असा सवाल यावेळी उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना चिमटा काढला. दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीची उभारणी करण्यात येणार असून कांदा उत्पादक म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांदा हब उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचं  सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितलं.

पणन खात्याच कार्यालय उत्तर भारतातसह आसाम येथे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, उत्तर भारतात जाणाऱ्या  प्रवाशी रेल्वे गाड्यांमध्ये किसान बाजार नावाचा स्वतंत्र डब्बा जोडून शेतकऱ्यांचा कांदा आणि फळ उत्तर भारतात पाठविण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचंही यावेळी  सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 06:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...