Home /News /maharashtra /

VIDEO : 'पोरांनी माझी जमीन विकून खाल्ली, आज मला घरातून बेघर केलं'

VIDEO : 'पोरांनी माझी जमीन विकून खाल्ली, आज मला घरातून बेघर केलं'

गेल्या सहा महिन्यांपासून या माऊलीचे हाल सुरू आहेत. 7 मुलांपैकी 4 मुली आणि 3 मुले आहेत.

    आसिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 29 जानेवारी : "आई वडील" यांना देवाचा दर्जा दिला जातो. पण, सांगलीमध्ये एक लांच्छनास्पद घटना घडली आहे. आईची जमीन विकून खाल्ली आणि म्हातारपणात तिला बेघर करण्याचा पोटच्या 7 मुला-मुलींनी केल्याची शर्मेची घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही माऊली थंडीत कुडकुडत मुलाची वाट पाहत होती. मात्र, मुलांनी घराला कुलूप लावून तिला उघड्यावर टाकले. अखेर शेजारच्यांनी त्या माऊलीचे हाल बघवत नसल्याने एका सेवाभावी संस्थेला बोलावून तिला आसरा देण्याचं काम केलं आहे. सांगलीच्या अहिल्यानगर येथील अयोध्या नगर येथे शांताबाई खोत (वय 75) या आपल्या मुलांबरोबर राहतात. त्यांच्याकडे 20 एकर जमीन होती. पण, कालांतराने मुलांनी ती विकून खाल्ली. आईला आता दीर्घ आजाराने ग्रासले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या माऊलीचे हाल सुरू आहेत. 7 मुलांपैकी 4 मुली आणि 3 मुले आहेत. पण आईला कोण सांभाळणार यांच्यावरून वाद सुरू होता. गेल्या तीन दिवसांपासून या माऊलीला मुलांनी घराबाहेर काढले आणि घराला कुलूप लावून बाहेर निघून गेले. मुलं परत येतील या आशेपोटी ती मुलाची वाट पाहत आहे. मात्र, मुलं येण्यास तयार नव्हते. 'मुलांनी माझी जमीन विकून खाल्ली आणि मला कुणीही सांभाळत नाही' असं म्हणत या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. गेल्या तीन दिवसांपासून ही माऊली घराबाहेर थंडीत कुडकुडत होती. अखेर शेजाऱ्यांनी तिला झोपण्यास चादर दिली आणि इन्साफ फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेला कळवलं. तात्काळ इन्साफ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या माऊलीला आपल्या संस्थेत निवारासाठी घेऊन गेले. या मुलांवर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं, इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी सांगितलं आहे. ===================
    First published:

    Tags: Sangali, सांगली

    पुढील बातम्या