मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सचिन वाझे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, राज्यपालांची घेणार भेट!

सचिन वाझे प्रकरणात प्रकाश आंबेडकरांची उडी, राज्यपालांची घेणार भेट!

'फक्त निवडणुकींसाठी एका राज्यात 17 वेळा जाणे, हे पंतप्रधानांना शोभणारे नाही. मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे'

'फक्त निवडणुकींसाठी एका राज्यात 17 वेळा जाणे, हे पंतप्रधानांना शोभणारे नाही. मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे'

'फक्त निवडणुकींसाठी एका राज्यात 17 वेळा जाणे, हे पंतप्रधानांना शोभणारे नाही. मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे'

सोलापूर, 20 मार्च : मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आता या प्रकरणात वंचित बहुजन विकास आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उडी घेतली आहे. या प्रकरणी राज्यपालांनी (governor of maharashtra) भेटून आपली भूमिका मांडणार, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूरमध्ये  (Solpaur) पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

'मुंबईमधील मायकल रोडवर एक स्फोटकांनी गाडी सापडली. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रोज नवनवीन माहिती मिळत आहे. या प्रकरणात 22 तारखेला आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार असून त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका मांडणार आहोत', असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

'पंतप्रधान मोदी (Pm Narendra modi) यांना एकच काम राहिलेलं दिसतंय, उठसूट पश्चिम बंगालला (west bengal assembly election 2021) जायचं आणि राज्यातील निवडणुकामध्ये मधे करायचं. फक्त निवडणुकींसाठी एका राज्यात 17 वेळा जाणे, हे पंतप्रधानांना शोभणारे नाही. मोदींनी पंतप्रधान पदाची गरिमा घालवली आहे. त्यांच्यावर गल्लीतला कार्यकर्ता देखील टीका करत आहे. याचा भाजपने विचार केला पाहिजे', असा  टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेबद्दल नवी सूचना

'चीनने 20 सैनिक मारले असे हे सरकार म्हणत आहे.ज्या चायनिज app, गुंतवणुकीवर बंदी आणली होती. चीनने आपलं सैन्य माघार घेतलेलं नाही, अशात चीनला गुंतवणूक करण्याची परवानगी कशी दिलीयाचा खुलासा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी करावा, असं आंबेडकर म्हणाले.

'महाराष्ट्र बजेट झाला, काय बजेट आहे कोणाला माहिती नाही. कोरोना एक साधन झालं आहे. डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी या सगळ्यांनी कोरोना रुग्ण वाचवले. शासनाने मात्र दुर्दैवाने कोविड-19 चे नाटक पुन्हा सुरू केलं आहे. ज्या शहरात तुम्ही लॉकडाउन केलं तिथलं कोविड थांबलं का?' असा सवालही आंबेडकर यांनी केला.

'लॉकडाउनला लोकांचा विरोध आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गोष्टीचा विचार करून लॉकडाउनबाबत विचार केला पाहिजे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जन्मठेपेपासून वाचण्यासाठी बनवलं स्वतःचं मृत्यू प्रमाणपत्र, 15 वर्षांनी सत्य समोर

'पंढरपुरात वंचितचा उमेदवार असणार आहे. आम्ही एक जातीय राजकारण करत नाही.  पडळकर भाजपमध्ये गेले, त्यांनी स्वतःची अवस्था वाईट करून घेतली. केंद्रात सरकार आहे, धनगर समाज त्यांना विचारत आहे की, आरक्षण मिळवून द्या. गोपीचंद यांची कमतरता भासेल असं वाटत नाही', असं म्हणत आंबेडकर यांनी पडळकरांना टोला लगावला.

अजित पवार यांचा खोटारडेपणा बाहेर पडलेला आहे. सभागृहात स्थगिती देतात, पुन्हा वीज तोडणी होते. पंढरपूर मतदारसंघातील लोकांना संधी आहे, खोटारड्यांना जागा दाखवण्याची, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांवर टीका केली.

First published:
top videos